चंद्रावरचे डाग खूप खोल दिसतात आजकाल
ती उपमा ते अलंकार खूपच फोल वाटतात आजकाल...
सबुरीनेच घेतले मी प्रेमाचे आलाप
दणाणून सोडत गेले मात्र रुपांतरीत विलाप....
प्रेम काय प्रेम सर्वच करतात
कुत्र्या मांजरावरही प्रेम करता येतं....
नंतर जाणवलं की माझं प्रेम ही
कोनाड्यातच पडून होतं....
खरवडलेल्या त्वचेसह हसत होतं लाचार
माझीच खोली माझीच शेज माझाच असतो चित्कार....  
विवेकाचा विंचू जेंव्हा मेंदूत चावायला लागतो 
खोलीतील डीम लाईट हि रेड लाईट भासतो....  
काय मिळालं काय गमावलं याचे हिशेबच चुकणारे         
तेंव्हा शरीर हि अपुरं पडतं प्रेमाच्या मागणीपुढे....
दोन ध्रुवच नाही दोन आकाशगंगा झालो
तुझा सूर्य आणि माझा चंद्र असे दुभंगलो...
तुझे बोल ही जेंव्हा बेफिकीरीत विरले  

तेंव्हा चांदण्याचे हात माझे माझ्याच भवती फिरले...