किंमत

राऊळांची कवाडं बंद झाली
नकारघंटांची किणकिण सुरु झाली...
आत देव झोपलाय
श्रीमंतांच्या जमाखर्चाची बेरीज करून
पहाट होताच जमेचा हिस्सा आपला होईल म्हणून..
ज्याची जमा मोठी, त्याच्या हाकेला धावायचं...
नुसतं हात जोडणाऱ्याला असतं का कधी पावायचं !!!
म्हणतो, ‘भक्ताने भक्ती करावी नि:स्वार्थी भावनेने..’
भक्ती नि:स्वार्थी कशी असते हे एक तोच जाणे...
दारावरचा भक्त याचक झाला आहे
त्याचा उपाशी आवाज ही आता जाचक झाला आहे....
पण म्हणून जमेची बाजू उणी करावी
खर्चाची बाजू वाढवून ??
छे ! छे !! भक्ताला याचकच राहू द्यावं
आपली किंमत वाढवून
आपली किंमत वाढवून