पुन्हा एकदा तुझा द्राविडी प्राणायाम
अनेकांचे श्वास रोखून गेला....
देव्हारे माजवणाऱ्यांना नि:स्तब्ध
करून गेला....
Dependable Wall
म्हणत कौतुकांनी तुझ्या कॉलम्स भरले
पण आज तुझ्या एका नकाराने उर भरून
गेला...
तू बेंगलोर विद्यापीठाची डॉक्टरेट
स्वीकारली असतीस
तर कदाचित दुरावला असतास...
पण आज
प्रेम करू तुझ्यावर की नतमस्तक होऊ ?
इतका अलिप्त कसा राहू शकलास
की समृद्धीची सारी वलयेच भेदालीस ?
तरीही संपन्न झालास...
राहुल,
भद्रा कात्यायनीच्या बाळाप्रमाणेच
तू साधेपणाचे ऐश्वर्य दाखवलेस...
असाच राहशील सदैव ?
निश्चयाचा महामेरू
आणि जिब्राल्टर बनून...?
– समिधा
0 Comments
Post a Comment