पडद्यांची सळसळ झाली,
दिवे चकमकू लागले,
पायाखालचे लाकडी स्टेज डळमळू लागले
कि समजावे
सीतेची एक्झिट जवळ आलीय,
तिचा रोल तिने पूर्ण केला
एक वर्तुळ पूर्ण झालं.
सीतेचे डोळे बंद होतात,
दिवे पूर्ण मालावतात...
हुंदक्यांची अनेक आवर्तने गळ्यापर्यंत येतात
पण श्वास नलिकेतून ती अन्ननलिकेत जातात आणि
पोटातल्या वेटोळयांमध्ये नाहीशी होतात.
कधीच त्यांचे हुंकार हि ऐकायला मिळणार नसतात.
स्टेज वरची सीता गर्भात ढकलली जाते.
नव्या प्रवेशासाठी...
नव्या रामायाणासाठी....
0 Comments
Post a Comment