वर्षाव त्या सरींचा न लगे जीवास माझ्या
आधार पागोळ्यांचा हळव्या मनास माझ्या....

वाटे बुडून जावे डोहात साठलेल्या
बूज प्राक्तनाची तिथेही कोरड्या मनास माझ्या....

डोळे सुकून गेले अन् ओंजळी रिकामी
स्वप्ने तरी उद्याची बावऱ्या मनास माझ्या....

कोलाहलात साऱ्या तू ऐक साद माझी
घ्यावे कलेकलेने कोवळ्या मनास माझ्या....

जेंव्हा तुझे ते शब्द धरतील हात माझे
कसली नुरेल चिंता निधड्या मनास माझ्या....