तुंबा हा चित्रपट एक विचित्रसा अनोखा अनुभव देतो

हा अनुभव म्हणजे मनातली कसली तरी कालवाकालव आहे, ती मनाच्या कुठल्या तरी कोनाड्यात धुसफुसतेयबाहेर फुटून यायला अधीर आहे, असं काहीतरी आहे. याला कारण आहे सद्य:स्थिती. सद्य:स्थिती आणि चित्रपट यांचा मेळ घालू नयेपण अलीकडे अनेक घटना अशा घडताहेत की त्या 'तुंबाड'शी नाळ जोडण्यास प्रवृत्त करतात.

सध्या Me Too Movement मुळे चाललेला गदारोळ आणि मनवरांच्या कवितेवरून उठेलेलं वादळ हे स्त्रीदेहाशी संबंधित आहे आणि यातच 'तुंबाडआलाय. अनेक लोक म्हण आहेत की या कथेच्या केंद्रस्थानी लालसा आहे. हो. नक्की लालसाच आहे. पण या लालसेच्या केंद्रस्थानी गर्भाशयही आहे असं मला वाटतं.

स्त्री हे नरकाचं महाद्वार आहे असं म्हणणाऱ्यांनी तिच्या योनीची कधी शब्दांनी तर कधी विकृतीने विटंबनाच केली. 'तुंबाडही विटंबना प्रत्यक्ष 'दाखवतो'. अगदी गर्भाशयात होणाऱ्या धुमश्चक्रीनिशी दाखवतो. तो दाखवतो की स्त्री मानवी असली काय किंवा देवता असली कायतिची विटंबना ही ठरलेलीच.

तुंबाडमधल्या मानवाचं साहसत्याची लालसा आणि भय हे सर्व त्या गर्भाशयाशी निगडित आहे. माणसाची श्रीमंत होण्याची लालसा आणि दानवांची अन्नाची भूक ह्या दोन्ही गोष्टी त्या गर्भाशयात एकवटल्यात.

"तुंबाड" मधली मातृरूपी पूर्तीची देवता आपल्या आद्य पण लालची पुत्राला अभय देते आणि "जो जे वांच्छील तो ते लाहो," या न्यायाने त्या आद्य पुत्राने सर्व जगाची संपत्ती हडपली तरी त्याने अन्नधान्य हडपू नये म्हणून त्याला बळजबरीने आपल्या गर्भाशयात डांबून ठेवते. कारण तो देव असला तरी त्याची कृत्ये दानवासारखी आहेत. अतिच्या हव्यासाने त्याला लालची दानवच केलंय. तो तिथे आहे म्हणून ती शतकोनशतके रज:स्वला होत राहते, तिचं गर्भाशय अजूनही उसासे टाकतंय. तिच्या ओलेत्या रक्तगर्भित अस्तरावर ती अजूनही त्याला पोसतेय कदाचित म्हणूनच दिग्दर्शक राहीने या दानवाला 'हस्तरहे नाव दिलंय.

हस्तराकडे अमाप संपत्ती आहे, ही त्याने लोकांकडून हिसकावली आहे पण अन्न नाहीतो शतकानुशतके अन्नाच्या प्रतिक्षेत आहे. देवीच्या गर्भाशयात तो सुखरूप आहे एवढंच. पण ते गर्भाशयच त्याचं विश्व आहेजो उगीच त्याच्या या विश्वात, देवीच्या गर्भाशयात घुसखोरी करतो त्याला हस्तर रक्ताच्या थारोळ्यात गाडून टाकतो. त्या घुसखोराला ना मृत्यू मिळत ना मुक्तीतो अश्वत्थाम्यासारखाही नाही जो  अनंत जखमा घेऊन मुक्तीची वाट पाहत राहतो. पण जो त्याला अन्न देतो तो श्रीमंत होतो आणि पुन्हा पुन्हा योनीत प्रवेश करण्याचा त्या अन्नदात्याचा मार्ग सुकर होतो.

तुंबाडच्या देवीच्या योनी द्वारापासून ते गर्भाशयाच्या अस्तरापर्यंत लालसा, भूक आणि साहसाची ही धुमश्चक्री सुरु असते. हस्तराला ज्याने खाऊ घातलं तो श्रीमंतही होतो आणि अफाट साहस करून योनीच्या बाहेरही येतो. पण हस्तर स्वत: कधीच बाहेर येऊ शक नाही. तो ती लालसा बनून आतच राहतो आणि समृद्धीची, श्रीमंतीची लालसा बाहेर पेर राहतो. ही लालसा जितकी संपत्तीची तितकीच योनीचीही. पण मानवाची ही लालसा जेव्हा कैक पटीने वाढते तेव्हा हस्तराचे शुक्राणूंप्रमाणे अनेक दानव बनतात. गर्भाशयातील अंड फलित करण्यासाठी जशी शुक्राणूंची झुंबड उडते तशी त्या अनेक हस्तरांची उडते. एकमेकांना गर्भाशयातील अस्तराच्या रक्तात डुंबवून मारू लागतात. या सगळ्याला कारण असलेली लालसा जेव्हा अक्राळविक्राळ रूप धारण करते तेव्हाच ती अखेरचा विनाश करून शमते.

कोणत्याही स्त्रीला जबरदस्ती मान्य नाही, तिला लालसेपेक्षा प्रेम आणि आपुलकीने तिची काळजी घेणारा पुरुष अधिक प्रिय असतो. त्याच्यासाठी ती आयुष्य ओवाळून टाकते. त्याला प्रेमाच्या वर्षावाने श्रीमंत करते. पण जो तिच्यावर मानसिक आणि शारीरिक जबरदस्ती करतो, त्याला ती नाकारते. त्याला शारीरिक सुख मिळत नाही की मानसिक स्थैर्य. रौरव म्हणजे काय याची प्रचीती तो घेतो. तुंबाडमधला हस्तरदानव असला तरी तो मला स्त्रीच्या जाज्वल्य अभिमानाप्रमाणे भासतो. स्त्री जोवर रज:स्वला होतेय तोवर स्त्रीदेह हे लालसेचं कारण बनत राहील, ते नैसर्गिक आहे. पण ती हे कोणाला विसरू देत नाही की ती आपल्या उदरात एक हस्तरही पोसतेय आणि अशा स्त्रीचा अपमान करणाऱ्याचा विदारक अंतही होतो. 

तुंबाडस्वातंत्र्य पूर्व काळात सुरु होऊन स्वातंत्र्योत्तर काळात संपत असला तरी तो आजच्या स्त्रीची ही गोष्ट सांगतो. स्त्री ब्राम्हण असली काय किंवा आदिवासी, अभिमान दोघीनाही आहे, तुंबाड मधली स्त्री अनेक ब्राम्हणी साहित्यातून दिसलेली घर सांभाळणारी आणि पतीची दुसरी स्त्री सहन करून त्याची वाट पाहणारीच आहे. ७० वर्षापूर्वीच्या या स्त्रीचा माजघरात एकाकी झगडा सुरु होता आणि त्यासोबत माडीवरच्या सवतीला ती पोसतही होती. आज मात्र स्त्रीने स्वत:च्या इच्छेकडे आधी स्वत: सकारात्मकरित्या पाहण्याचं ठरवलंय. होआणि नाहीम्हणण्याचा अधिकार तिला जन्मजात आहेच आणि त्यासाठी ती स्वत: पुढाकार घेतेय. कोणाला आपल्या सान्निध्याने श्रीमंत करायचं आणि कोणाला स्पर्शुही द्यायचं नाही हे ती स्वत: ठरवतेय. आणि जो दु:साहस करतो त्याला जगासमोर उघडं पडण्याचं बळही तिने आज एकवटवलंय. Me Too ने एका वेगळ्या बदलाची सुरुवात नक्कीच झाली आहे.  

आता मनवराच्या कवितेविषयी. ही पूर्ण कविता इथे वाचू शकाल. नवारांच्या कवितेला कितीही काव्यात्मक दृष्टीने पाहिलं तरी तीओळ डोक्यात घुमत राहते. कविता नुसती कविता संग्रहापुरती असती तर आम्हाला त्याविषयी कळलं ही नसतं. ज्यांना तिचं रसग्रहण करायचं त्यांनी ते केलं असतं. पण हि कविता बी..च्या शेवटच्या वर्षाला लावणं हे जरा अति आहे असं माझं मत आहे. अजून आमची नजरच तयार झाली नाही तिथे तुम्ही समोर सूर्य काय आणून ठेवता? ७० जणांच्या वर्गात ही कविता कशी शिकवली जात असेल बरं? कविता कितीही प्रगल्भ विचारांनी परिपूर्ण असली तरी कविता वाचताना मुलींना जर अवघडल्यासारखं वाटत असेल तर पुढची कविता कोण वाचेल?

आपल्या समाजाचा एक हिस्सा प्रचंड प्रगल्भ झालाय, किमान पुरोगामी कप्पा तसं मानतो. पण जे अजून संक्रमणाच्या प्रक्रियेत आहेत त्यांच्या कलेने घेऊन त्यांना सोबत घेण्याची जबाबदारी पुरोगामी वर्गाची नाही का? अर्धेमुर्धे किंवा मधूनच कुठेतरी फाटलेले कपडे घालून सिगारेटचे झुरके घेत, दारू पीत सगळ्यांना शिव्या घालणं म्हणजे पुरोगामित्व का? हे असलं पुरोगामित्व म्हणजे नेमकं काय हे मला कधीच कळलं नाही. ते पुरोगामित्व त्यांनी आपल्या ब्रांडेड शबनम झोळीमध्ये ठेवावं आणि थोडं त्यांना पण बोलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी वाव द्यावा ज्यांच्या अस्तित्वावर मोठ मोठी संमेलनं भरवली जातात. Me Too ला पाठींबा द्यायचा आणि एका ओळीसाठी असलेल्या झगड्याला अपरिपक्वता म्हणायचं, याला दांभिकपणा का म्हणू नये?

 मनवरांच्या कवितेत स्त्रीदेहाची विटंबना नाहीय पण जे काही आहे ते सहज स्वीकारण्यासारखं खचितच नाही. यावर मतमतांतर आहेतच. हा खरंच मन्वतराचा काळ आहे पण म्हणून कोणीही कोणत्याही स्त्रीला गृहीत धरू नये. "हस्तर आहे आम्हा प्रत्येकीच्या उदरात. आम्ही ठरवू कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला गाडायचं ते."