विज्ञान हे भाकडकथांवर नाही तर तथ्यांवर आधारलेलं असतं हेच अनेकवेळा सिद्ध झालं आहे. एवढं होऊनही `हिग्ज बोसॉन'लाही इश्वरीय पठडीत गणलं जात आहे. `हिग्ज बोसॉन'ला `गॉड पार्टिकल' म्हटलं आणि न्यूटनच्या नियमाप्रमाणे गेलो तर ऍक्शन करणाराही `तोच' आणि इक्वल अँड ऑपोझिट रिऍक्शन करणाराही `तोच' असा काही तरी धार्मिक उदासिन नियम प्रस्थापित होईल, जे समाजजीवनासाठी घातक आहे.
विश्वबंधुत्वासाठी हिग्ज बोसॉन
बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या
राष्ट्राध्यक्षपदावरून पहिल्यांदा जनतेला
उद्देशून जे भाषण केलं
ते आजही अनेक राजकीय
अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरत
आहे. त्यातील `वी
विल' हा आशावाद जितका
सर्वांना स्पर्शून गेला
तितकाच 'Our patchwork heritage is a strength, not a weakness. We are a nation of Christians and Muslims, Jews and Hindus and non-believers.' या सर्वसमावेशक विचाराने जगभरात प्रशंसेची लाट उसळली. त्याला कारण होतं ते त्यांचं आस्तिकांसोबतच नास्तिकांनाही संबोधित करणं. संपूर्ण जगात Non-Believers चा म्हणजेच कोणत्याही इश्वराला किंवा त्याच्या अंशाला न मानणारा एक मोठा वर्ग आहे. हा वर्ग मानतो तो केवळ निसर्गाला. आणि विश्व निर्मिती कोणी केली यापेक्षाही निर्माण झालेल्या विश्वाला ब्रदरहूड म्हणजेच बंधुत्वाने जोडण्याच्या संकल्पनेलाच अधिक महत्त्व देतो. पण हे बंधुत्व देखील ‘आपण सर्व एकाच पेशीतून जन्माला आलोय’ या मानववंशशास्त्रीय निष्कर्षावर आधारलेलं असल्यामुळे विश्व निर्मिती आणि सजीव निर्मिती कोणी केली या प्रश्नावर येताच विचारप्रक्रिया थंडावते. विश्व निर्मिती बिग बँगच्या प्रक्रियेतून झाली पण बिग बँग कोणी घडवलं, त्याच्या आधी जगात काय होतं, कोणती शक्ती या सगळ्यामागे कार्यरत आहे अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी, त्याच्या संशोधनासाठी जगभरातील हजारो वैज्ञानिकांनी दिवस रात्र मेहनत केली आणि शतकभरापूर्वी सत्येंद्रनाथ बासू यांनी आल्बर्ट आईनस्टाईन यांना
लिहीलेल्या पत्रात उल्लेख केलेल्या
अणूच्या उपकणाचा शोध ४ जुलै रोजी European Organization for Nuclear Research ने जाहीर केला. आपले अस्तित्व दाखवून क्षणर्धात नाहिसा होणाऱ्या या कणाचा प्रयोगात्मक अभ्यास करणाऱ्या पिटर हिग्ज आणि बासू यांच्या नावावर या उपकणाचं ‘हिग्ज बोसॉन’ असं बारसं खूप आधीच झालं होतं. आता त्याच्या अस्तित्वावर अंशत: मोहोर उमटली आहे एवढंच. पण एवढ्याशा यशानंतरही इश्वरावर श्रद्धा असणाऱ्यांनी त्याचं ‘गॉड पार्टिकल’ अर्थात ‘इश्वराचा अंश’ असं नामांतर करून टाकलंय. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी या ‘हिग्ज बोसॉन’चा सामान्य जनांना काय उपयोग होऊ शकतो याचा पडताळा घेण्याऐवजी खरंच इश्वर आहे का याची कुठल्याही प्रयोगाशिवाय नस्ती उठाठेव सुरू केली आहे. ‘हिग्ज बोसॉन’ सारख्या महत्त्वाच्या शोधालाही ‘गॉड पार्टिकल’ सारख्या सवंग संज्ञांमध्ये गुरफटून टाकलं तर त्याच्या संभाव्य फायद्यांचा आपण कधी विचारच करू शकणार नाही.
‘हिग्ज बोसॉन’
हा अणूचा उपकण प्रत्येक
पदार्थाच्या सोबत जातो. तो
त्या त्या पदार्थाला वस्तूमान
देतो. अर्थात त्याला वजन
किंवा दृश्यात्मकता देतो.
सत्येंद्रनाथ बासूंनी मांडलेल्या संकल्पनेनुसार
एखादा पदार्थ जेंव्हा आकार
घेत असतो तेंव्हा त्याला
विरोध करणारी एक शक्ती
असते. या शक्तीमुळे त्याची
गती मंदावते आणि त्याला
आकारमान आणि वस्तूमान प्राप्त
होतं. ही विरोध करणारी
शक्ती दुसरी तिसरी काही
नसून अवकाशातील अणू
रेणूंचाच एक भाग आहे.
या संकल्पनेमध्ये कुठेही
इश्वरीय शक्तीचा उल्लेख नाही.
तरीदेखील त्याला ‘गॉड
पार्टिकल’ म्हणणं यासारखी
बौद्धिक दिवाळखोरी दुसरी
नाही. कृष्णाने अर्जूनाला
विश्वरूप दाखवलं हा त्याचाच
एक भाग आहे म्हणजेच
`व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्' हि
उक्ती इथेही लागू होते
असं मत नोंदवलं जात
आहे. डीएनएच्या शोधानंतरही
अशाच वावड्या उठल्या होत्या.
पण शेवटी विज्ञान हे
भाकडकथांवर नाही तर तथ्यांवर
आधारलेलं असतं हेच सिद्ध
झालं. एवढं होऊनही ‘हिग्ज बोसॉन’लाही
त्याच पठडीत गणलं जात
आहे. ‘हिग्ज बोसॉन’ला ‘गॉड
पार्टिकल’ म्हटलं आणि
न्यूटनच्या नियमाप्रमाणे गेलो
तर अॅक्शन करणाराही
‘तोच’ आणि
इक्वल अँड ऑपोझिट रिअॅक्शन करणाराही ‘तोच’ असा काही
तरी धार्मिक उदासिन नियम
प्रस्थापित होईल, जे समाजजीवनासाठी
घातक आहे.
‘हिग्ज बोसॉन’च्या पदार्थाला वस्तूमान
देण्याच्या गुणधर्मामुळे त्याचे
आपल्या आयुष्यात फार
महत्त्व आहे. हे उपकण
फक्त प्रकाशाला वस्तूमान
देत नाहीत. त्यामुळे
पदार्थाला ते चिकटूच दिले नाही किंवा त्याला
प्रभावहीन केलं
तर एखादा पदार्थ सहजगत्या
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, तो
ही प्रकाशाच्या वेगाने.
रेडियो लहरींच्या शोधाचा
उपयोग आकाशवाणी, दूरचित्रवाणी, मोबाईल्स यांच्या निर्मितीमध्ये
झाला. तसंच, या उपकणांचं
अस्तित्व आणि पदार्थाचं वस्तूमान
‘शून्य’ करणारं
उपकरण निर्माण झालं तर
एखादी व्यक्ती इप्सित ठिकाणी
क्षणार्धात पोहोचू शकेल. आणि
झालंच तर विश्वातील अन्याय
अत्याचार संपून जातील. खऱ्या अर्थाने विश्वबंधुत्व आकाराला
येईल. पण त्यासाठी परावलंबी
करणाऱ्या ‘गॉड पार्टिकल’
या संज्ञेचा मागमूसही
रहायला नको.
0 Comments
Post a Comment