`माझा देश एक व्हायरस
HIV चा
केलेल्या कर्माची फळं भोगणारा
महारोगापेक्षाही महाभयंकर`
एक चपराक `मेरा भारत महान` म्हणवणाऱयांच्या गालफडावर... जातीयतेची डायनॉसॉररुपी किड बाळगत संस्कृतीचा टेंभा मिरवणाऱयांच्या मेंदूर्च एक्स रे. प्रा. अभिनया रमेश यांची भारताच्या तथाकथित संस्कृतीच्या अवाजवी थोरलेपणावर त्या बेगडी संस्कृतीची जागा दाखवून देणारी असंस्कृती. कवितासंग्रह नव्हे एक स्कॅनिंग रिपोर्ट.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हरतऱहेच्या प्रयत्नानंतर आणि त्यांच्यानंतरच्या कार्यकर्त्यांच्या फळीने समाजाच्या उन्नयनासाठी केलेल्या अहोरात्रीच्या कष्टानंतरही दलित वर्ग 60 वर्षांनंतरही मागासलेलाच आहे. या मागासलेपणाचीही आता सवय झाली आहे की काय अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती आज खेड्यातच नाही तर गावोगावी ही दिसतेय. या परिस्थितीनेच चळवळे आणि साहित्यिक एकाच वेळी जन्माला घातले. म्हणूनच की काय दलित साहित्यात विद्रोहाशिवाय दुसरं काय मिळणार अशी अंडरलाईनही तयार झाली. प्रा. अभिनया रमेश यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या `असंस्कृती` या कवितासंग्रहातही हा विद्रोहच प्रामुख्याने दिसतो फक्त त्याची जातकुळी वेगळी आहे. कारण हा विद्रोह एका अखंड समाजाला जातियतेच्या बंधनात अडकवलेल्यांच्या विरोधात जितका जहाल आहे तितकाच तो स्वकीयांच्या विरोधात अणकुचीदार आहे. `इत्यादी इत्यादी` या कवितेत त्या म्हणतात,
`माझा समाजच बनलाय  
एक जात प्रकल्प
पोट भरलेले, नि
पोट न भरलेले`
तर `त्यांनी` या कवितेत
त्यांनी मनात `फुले असणाऱयांना
सावरकर गायला लावले....
आंबेडकरांशी प्रतारणा करण्याचं
शिक्षणच दिलं`
चेतलेले स्फुल्लिंग असे लिलया शमवले गेले. कारण
`त्यांची संस्कृती म्हणजे
इतरांना कुजवून
स्वतला सजवणारी...
Allenation चा अघोरी उच्चांक`
पण ते स्फुल्लिंगही रेतीचे कण बनून भरकटले याचं शल्यच अधिक.
`हे भेकड चाळे थांबवायचे आहेत` या कवितेत त्या म्हणतात,
`तुमच्या प्रश्नांची `प्रणाली` निर्माण करणारे
तुमच्या प्रश्नांवर Value judgement देणारे असतात
तुमचेच मारेकरी तुमच्या प्रश्नांवर NGO काढतात
तुमच्या प्रश्नांची आणखी दिशाभूल करण्यासाठी`
मात्र `पूर्वी पाटलाच्या ओसरीवर बसणारे आणि आता भवनांच्या ओसरीवर बसणाऱया` त्यांना प्रा. अभिनया भिमा कोरेगावच्या शौर्याची ही आठवण करुन देतात, `शून्य` या कवितेत.
`कमी शून्यांनी केली कमाल
सहस्त्रावधी शून्यांचे केले जीवन हालाहाल....
त्यांची अडीच हजार वर्ष.... यांचे फक्त 12 तास`
प्रा. अभिनया रमेश यांच्या या कवितासंग्रहातील या सर्व कविता जगण्यातली बंडखोरी दाखवतातच पण एक स्त्राr म्हणून असलेल्या त्यांच्या जाणिवा निव्वळ अबला-सबला कॅटेगरीतल्या नाहीत. `बर्प`, `स्त्राrत्व`, `सुरेखा`, `प्रियांका` या कवितांना स्त्राrच्या माणूसपणाची जहाल आणि मवाळ अशी दोन्ही आवरणे आहेत. उदा. `स्त्राrत्व` या कवितेची सुरुवातच `दुर्बलतेची महान संज्ञा` या ओळीने करतात. सध्या दूरचित्रवाणीवरील मालिका पाहून स्त्रियांमध्ये होत असलेले कन्फ्युज्ड बदल पाहिले की ही स्त्राrत्वाची ओरिजिनल जहाल संज्ञा असल्याचे पटते. तर `बर्प` या कवितेत तो मवाळपणा येतो,
`बर्फासारख्याच स्वच्छ, सुंदर
पण अस्तित्व संपणाऱया
काळाच्या सहाणेवर... विरुन विरुन जाणाऱया`
Shame on you या इंग्रजी कवितेतही प्रस्थापितांच्या कारवाया दाखवून त्यांना नामोहरम करण्याची वृत्ती दिसते.
बाबासाहेब हे सकल कवी लेखकांसाठी प्रेरणास्थान आहेच. पण प्रा. अभिनया बाबासाहेबांकडे एका धाडसी नजरेतून पाहतात. `बाबासाहेब` ही कविता वाचताना बहादूरशहा जफरच्या ओळी आठवतात. `दिल्लीसे मुझे मुहोब्बत है, मेरी माशुका की तरहा...` तुमचं प्रेरणास्थान तुमच्या काळजाच्या किती जवळ आहे याचाच हा प्रत्यय.
ब्रिटीश चिविंग ह्युमन राईटसची फेलोशिप मिळवलेल्या आणि लंडन विद्यापीठातून एम.ए झालेल्या, मुंबईमधून कायदेविषयक पदवी मिळवलेल्या प्रा. अभिनया रमेश या बालपणापासूनच आपले वडीलांना आणि त्यांच्या चळवळीतील सहभागाला पहात आल्या आहेत. त्यांचे आई आणि वडील या दोहोंचेही संस्कार कवितांमधून प्रतिबिंबित होतात. त्यांच्या कवितांमधून भेटणारी त्यांच्यातील आई, त्यांच्यातील विद्यार्थ्यांना हवीहवीशी वाटणारी प्राध्यापिका, त्यांच्यातील अल्लड प्रेयसी आणि त्यांच्यातील विश्लेषक ठायी ठायी दिसते. त्यांनीच मनोगतात म्हटल्याप्रमाणे `काही घटना होकारात्मक तर काही अस्तित्वाची चीड आणणाऱया. आणि त्याच exactly कारण ठरल्या मूलभूत कारण शोधायला, आणि कविता आकारल्या.` जोहान्सबर्गला गेलेलं असताना कृष्णवर्णियांचा अतोनात छळ नेल्सन आणि अँजेला मंडेला यांचे परिश्रम आठवून त्यांना अस्वस्थ होते, हा ही या कारण शोधण्याचाच परिणाम. 

प्रा. अभिनया रमेश यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. त्यांच्या प्रगल्भतेची जाणीव समस्त आंबेडकरी स्त्रियांमध्ये पाझरण्यासाठी त्यांनी आणखी लिखाण करावं, यासाठी त्यांना शुभेच्छा.