`ये चांद सा रोशन चेहरा' असं 70 च्या दशकात टीजिंग करणाऱया नायकाला 2000 साली `मुझे भुलेसे भी चांद तुम ना कहो, चांद में तो कई दाग है' असं नायिका ऐकवायला लागली

कारण ज्या चंद्राची उपमा तिला दिली जातेय त्या चंद्रावर डागच नाहीत तर कृष्णविवरे सुध्दा आहेत हे तिला कळलं होतं. त्यामुळे मजनू बनून उसासे टाकणाऱया समस्त वासुंची मोठी पंचाईत झाली एवढं नक्की. आणि हे घडवून आणणारे ही दोन पुरुषच, त्यामुळे तर बोलतीच बंद. पण असं असलं तरी त्या हजारो मैल दूर असलेल्या चांदोबाला भेटून आलेल्या नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन विषयी कमालीची क्युरियॉसिटी नसेल असा एकही मनुष्यपाणी या पृथ्वीतलावर उरला नाही, हेही तितकंच खरं.

25 ऑगस्ट 2012 रोजी नील खऱया अर्थाने ढगांच्या आड गेला. आणि नेहमीपमाणे त्याच्या विषयीच्या संभ्रमाना आणि विवादाना नवे धुमारे फुटले. नील आणि ऑल्ड्रिन जेव्हा चंद्रावर पोहोचले तेव्हा नीलने आधी चंद्रावर पाउढल टाकले. आणि तो म्हणाला, 'One small step for A man, one giant leap for mankind.'  अर्थात `एका माणसाचं एक लहानसं पाऊल आणि मानवाची उत्तुंग भरारी.' व्याकरणाच्या अनुषंगाने हे वाक्य एका विशिष्ट माणसाला उद्देशून असल्यामुळे ते विशेष वाक्य होतं. पण हे वक्तव्य या उंच भरारीनंतर आणि आता त्याच्या मृत्युनंतरही One small step for man, one giant leap for mankind  असं उच्चारलं जात होतं. याचा अर्थ होतो `माणसाचं लहानसं पाऊल आणि मानवतेची उत्तुंग भरारी.' जे वक्तव्य सर्वनामी स्वरुपात मोडतं. संगणकाद्वारे आवाज व्यवस्था ऐकण्याची मुभा उपलब्ध झाल्यानंतर ऑस्टेलियाच्या पिटर फोर्ड याने या वक्तव्यात ‘A’ असल्याचं लक्षात आणून दिलं आणि नेहमी पसिध्दी माध्यमापासून दूर असणाऱया नीलनेही त्याला दुजोरा दिला.

नीलच्या मृत्युनंतर त्याचे स्पेससुटमधले चंद्रावरचे फेटो छापून येणं ओघानेच आलं. पण या स्पेससूटमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर डावा हात वर करून उभा असलेला नील नाहीच. तो आल्ड्रिन आहे.

 

 चान्द्र सफरीवर निघण्यापूर्वी नीलने साधा कॅमेरा घेतला होता. तर ऑल्ड्रिनकडे असलेल्या कॅमेऱयाने त्याला फक्त काही विशिष्ट तांत्रिक बाबींचे फोटो काढण्याची परवानगी होती. त्यामुळे नीलने आपल्या कॅमेऱयात ऑल्ड्रिनचे अनेक फोटो घेतले. चंद्रावरचा पहिला माणूस म्हणून जो नेहमी फोटो दाखवला जातो तो यातील ऑल्ड्रिनचा आहे. ऑल्ड्रिन याबाबतीत अगदी मजेशीर गोष्ट सांगतात. ते म्हणतात, `नीलची फोटोग्राफी अगदी माझ्या बायकोसारखी होती, म्हणजे फोटोतल्या माणसाचं डोकंच उडवायचं. माझा चंद्रावरचा फोटोदेखील त्याने काढला, त्यात त्याने डोकं छाटलं नाही पण डोक्याच्या कडेवर त्याची फ्रेम होती. हा फोटो नासाकडे पोहोचल्यावर त्या फोटोवर संस्कार झाले आणि पाठीमागे डोक्याच्यावर काळं आकाश टाकलं गेलं.'

संदर्भ  

http://apple.copydesk.org/2012/08/25/keep-in-mind-as-you-put-together-your-neil-armstrong-packages-tonight/

नासाने फुटकळ प्रसिद्धीसाठी अशा अनेक गोष्टी केल्या तर काही केल्याच नाहीत. अशीच एक गोष्ट. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन (बझ)ऑल्ड्रिन हे दोघेही अडीच तास चांदोबाच्या पृष्ठभागावर होते. या दरम्यान 2 मिनिटांसाठी नासाशी त्यांचा संपर्प तुटला होता. या दोन मिनिटात त्यांनी एक विचित्र गोष्ट पाहिली

http://www.examiner.com/article/neil-armstrong-dies-along-with-secrets-of-what-he-saw-on-moon 

या दोन मिनिटांत कोणीतरी तिसरंच त्यांना न्याहाळत आहे असं नीलना वाटलं. 1988 साली प्रकाशित झालेल्या टिमोथी गूड यांच्या `अबोव टॉप सिकेटस्' या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे. अपोलो 11 मधून येणारे आवाजाचे सिग्नल्स नासाच्या ह्युस्टन हेडक्वार्टर वरील हॅम रेडियोवर येत होते. त्यात या दोन मिनिटांचं ध्वनीमुद्रण झालं आहे. यात या दोघांचे, `अरे बापरे, केवढे अवाढव्य ! मला खात्री आहे की इथे चंद्राच्या दुसऱया बाजूला आणखी कोणाचे तरी स्पेसक्राफ्ट नक्प्ची आलं आहे!' असे संवाद रेकॉर्ड झाले आहेत (`अबोव टॉप सिकेटस्' पान 384). पण हा प्रसंग आणि संवाद नासाने जनतेपासून लपवून ठेवला. मॉरिस चॅटेलेन या नासाच्या कम्युनिकेशन इंजिनिअरने निवृत्तीपश्चात `अवर कॉस्मिक ऍनसेस्टर' या 1975 साली प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकात नासाच्या अपोलो चांद्र मोहिमेतील कम्युनिकेशन पद्धतीचे सविस्तर वर्णन केले आहे. याबाबतीत त्यांनी लिहीले आहे की, `नीलने पहिलं पाऊल चंद्रावर ठेवण्याआधी दोन युएफओ (Unidentified Flying Object)  तिथून उडताना दिसल्या होत्या' ऑल्ड्रिन्ने त्यांचे अनेक फोटो काढले. यातील काही फोटो जून 1975 च्या `मॉडर्न पिपल' या अंकाच्या 25 व्या पानावर छापूनही आले.

 

अपोलो 11 मिशनच्या आधी झालेल्या 10 सफरी आणि जेमिनी या सफरींच्या दरम्यानही उडत्या तबकड्या दिसल्या होत्या. याची कल्पना त्या त्या वेळच्या अंतराळवीरांनी मिशन कंट्रोलला दिली होतीपण 1969 सालच्या अपोलो 11 चे हे वृत्त 1975 पर्यंत नासाने लपवून ठेवले कारण या मोहिमेत नासाचे नील आणि ऑल्ड्रिन यांना चंद्रावर पाऊल ठेवणे शक्य झाले होते. यामुळेच त्या सर्व तबकड्यांचं विश्लेषण नासाने कधीच दिलं नाही. नासाच्या अंतराळवीरांनी स्वतला कधीच हिरो म्हटलं नाही. कारण एका मोहिमेमागे किती लोकांचे कष्ट असतात याची त्यांना कल्पना होती. नासाने मात्र त्यांच्या सर्वच निरिक्षणांचा बारकाईने अभ्यास केला असं म्हणता येणार नाही. नील यांच्या मनातही कदाचित याचं दुःख असेल. म्हणूनच त्यांनी नासातून निवृत्त होऊन सिनसिनाटी मध्ये प्राध्यापकी केली. प्रसिद्धीपासून दूर राहिले. अगदी अपोलो 11 च्या यशाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. आज त्यांच्यासोबतच तबकड्यांविषयीची क्युरियोसिटीही लोप पावली आहे. 16 दिवसांची सफर आणि 80 प्रयोगाअंती पृथ्वीवर परतण्याच्या 16 मिनिटे आधी अंतराळात ठिकऱया उडालेल्या, आपली कल्पना चावला सहभागी असलेल्या `कोलंबिया' या शटलला आग कशी लागली हे ही असंच एक गूढ आहे. आता अंतराळात मिशन मार्स अर्थात `मंगळावरच्या मोहिमे' साठी प्रवास करत असलेल्या `क्युरियोसिटी'ची तरी खरी बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल ही अपेक्षा.