एखादी गोष्ट वारंवार आणि प्रभावीपणे सांगितली की ती जनमानसात रुजायला वेळ लागत नाही. गोबेल्सच्या या तत्त्वानुसार कोणत्याही धर्मातील दैवते, संत, महात्मे यांच्याविषयी त्यांच्या निकटवर्तीयांकडून अशाच प्रकारे काही मान्यता रुजवल्या जातात. कालांतराने त्या धर्माचा किंवा धर्मपरायणतेचा एक भाग होऊन जातात. महाराष्ट्रातील (सर्वात लोकप्रिय, प्रसिद्ध, संत, महापुरुष यातील कोणतं विशेषण लावायचं ते वाचकांनी ठरवावं) शिर्डीचे साईबाबा यांचं प्रस्थ किती मोठं आहे हे आपण सर्वच जाणतो. मात्र जे चरित्र वाचून ते प्रस्थापित झालं त्या गोविंद दाभोळकरांनी लिहिलेल्या साईसच्चरित्रातील कथा वाचल्या की साईबाबा काही तरी वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि चरित्रात ते वेगळं दिसतंय हे राहून राहून जाणवतं. साईसच्चरित्रात ज्या कथा येतात त्या सर्व कथांना आध्यात्मिक आणि भक्तीपूर्ण रुप दिलं गेलं आहे. यातल्या अनेक कथांचं सहजगत्या वैज्ञानिक विश्लेषण करता येऊ शकतं. पण जर असं विश्लेषण झालं तर श्रद्धावानांचा शिर्डीकडे येणारा लोंढा कमी होईल. कारण जिथे विज्ञान संपतं तिथे श्रद्धा सुरु होते असं वर्षोन्वर्षे या भक्तांना शिकवलेलं असतं. हकीम किंवा वैद्य म्हणून साईबाबांचा चरित्रात उल्लेख असला तरी श्रद्धेच्या माध्यमातून इलाज करणारा डॉक्टर असा त्यांचा लौकिक जाणूनबुजून तयार केला गेला आहे हे पदोपदी पटत राहतं. श्रद्धेच्या माध्यमाला मानसोपचारांची देखील इथे संज्ञा वापरलेली नाही. श्रद्धा म्हणजे इश्वराची मर्जी आणि सबुरी म्हणजे ती मर्जी आपल्यावर होईपर्यंत वाट पाहणे याच माध्यमातून भक्तांवर बाबांनी उपचार केले. ती मर्जी होत नाही तोपर्यंत `ठेवियले अनंते, तैसेचि रहावे’ हा उपदेश साईबाबांनी केला होता असं पटवून दिलं जातं. मनोज कुमारच्या सिनेमात मृत्यूच्या दारात पोहोचलेला मुलगा बाबांच्या हाकेने उठून उभा राहतो, तेव्हाच हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरतो. बाबा चमत्कारी आहेत, त्यांना सगळं काही शक्य आहे या विश्वासापोटी शिर्डी 12 महिने गर्दीने ओसंडून वहात असते. अर्थात त्यामुळेच शिर्डी संस्थानाची तिजोरीही!
साईसच्चरित्रात आलेल्या कथांचं अगदी सहज वैज्ञानिक विश्लेषण करता येऊ शकतं या पुष्टीसाठी `पाण्याने दिवे पेटवले` ही सर्वात लोकप्रिय कथा पाहूया. समुद्रामध्ये बोटी उलटून वाहून नेलं जाणारं कूड तेल त्या बोटी सभोवतीच्या समुद्री परिसरावर पसरतं, ही बाब आपल्याला नवीन नाही. या तवंग उठलेल्या पाण्याचा उपसा करणंसुद्धा फार धोकादायक असतं. कारण कोणत्याही ज्वलनशील पदार्थाने, कसल्याही घर्षणानी तिथे आग लागू शकते. कूड तेल हे कोणत्याही इंधन तेलाची अगदी प्राथमिक अवस्था (रॉ मटेरियल) असते. साईबाबा हे निष्णात हकीम होते. शिवाय शिर्डीपासून 90 किमी अंतरावर असलेल्या गोदावरीतून वाहतूक होत होती. शिवाय मुंबई 253 किमीवर. या सगळ्याचा साधकबाधक विचार केला तर कूड ऑईल साईबाबांना मिळणं कठीण नव्हतं, याच तेलाने जे पाणी मिश्रीत होतं त्याचाच उपयोग त्यांनी दिवे लावायला केला असावा याची खात्री पटते. फकीराला दिवाळीत दिवे काय करायचे आहेत असा त्यांचा उपहास करुन त्यांना जळाऊ तेल देणं शिर्डीच्या दुकानदारांनी नाकारलं तेव्हा त्यांनी कूड तेलाचं शुद्धीकरण न करताच ते वापरलं म्हणून ते पाणी मिश्रीतच राहीलं, असं या कथेचं विश्लेषण करता येऊ शकतं.
दुसरी एक कथा ही साईबाबांच्या सामाजिक कर्तव्यतत्परतेची आहे. मात्र तिच्यात जी काही भक्ती, श्रद्धा किंवा अंधश्रद्धा घुसडली आहे त्याला तोड नाही. 1911 च्या दरम्यान शिर्डीमध्ये प्लेगची भयंकर साथ आली होती. साईबाबांना स्वतला याची लागण झाली होती. पण ते त्यावर इलाज करत होते. मात्र शिर्डीभर पसरलेल्या प्लेगला बाबांनी कसं हद्दपार केलं याची ही कथा आहे. ती अशी. बाबांनी आपल्या पोत्यातील गहू काढले आणि ते (त्यांच्या आजही त्यांच्या मशिदीत द्वारकामाईत ठेवलेल्या) जात्यावर दळू लागले. चार बायकांनी त्यांच्याकडून जातं हिसकावून घेतलं आणि त्या स्वत दळू लागल्या. मग बाबांनी ते दळलेलं पीठ शिर्डीच्या वेशीवर टाकायला सांगितलं. गावकऱयांनी ते पीठ शिर्डीच्या सभोवती एका रेषेत पेरलं. आणि काय आश्चर्य! शिर्डीतून प्लेग अगदी गायब!! हा खरंच चमत्कार म्हणायला हवा! शिवाय या कथेचं केलेलं श्रद्धायुक्त विश्लेषण तर माईंडब्लोईंग! पण तूर्तास ते असू द्या. साईबाबांसारखीच आणखी एक व्यक्ती या भारतात होऊन नाही पण येऊन गेली. ते होते पॅट्रीक गेडस्. एक समाजशास्त्रज्ञ, पर्यावरणप्रेमी आणि नगररचनाकार. 10 वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात प्राध्यापकी केली. ते भारतातील सणउत्सवांकडे पर्यावरण रक्षणात लोकसहभागाच्या दृष्टीकोनातून पहात होते. ओडिशाच्या पूरीची जगन्नाथ रथयात्रा ही त्यांच्यासाठी सर्वात अधिक प्रेरक होती. या यात्रेच्या दरम्यान सर्व रस्ते लख्ख असतात. शिवाय यात्रेत सर्वात शेवटी चालणारा समूह हा रस्त्यात पडणारी फुलं, अबीर, गुलाल उचलत पुन्हा नव्याने रस्ते साफ करतात. यामुळे रोगराईचं नामोनिशाण नसतं. हा प्रयोग त्यांनी 1917 मध्ये इंदौरमध्ये पसरलेल्या प्लेगच्या दरम्यान केला. तिथल्या संस्थानिकांना त्यांनी सांगितलं की आपण एक रथयात्रा काढणार असल्याचं जाहिर करा. मात्र ही यात्रा नेमक्या कोणत्या विभागातून जाईल सांगता येत नाही. असं सांगितल्यामुळे नागरिकांनी अख्खं इंदौर स्वच्छ केलं. उंदीर, घुशींचा बंदोबस्त केला. बिळं बुजवली. कचऱयाची योग्य विल्हेवाट लावली. रथयात्रा निघाली एका मार्गावरुन पण त्यानिमित्ताने प्लेग पळाला. पण त्यामुळे पॅट्रीक गेडस् महात्मा ठरले नाहीत तर उत्तम नगररचनाकार समाजमानसशास्त्रज्ञ ठरले. त्यांची मंदिरं नाही उभारली गेली, तर समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ते प्रेरक ठरले.
साईबाबांच्या बाबतीत हिच गोष्ट घडली नाही. आज गौरी गणपती ते नवरात्र ह्या कालावधीतही रस्ते स्वच्छ नसतात. इतर वेळेची गोष्ट न केलेलीच बरी. साईबाबांचा जो आदर्श आपल्याला मिळायला हवा होता नेमका तोच मिळत नाही. त्यांच्या सभोवती असणाऱया दाभोळकर, चांदोरकर, दीक्षित, साठे, खापर्डे या सर्वांनी बाबांना देवाचा दर्जा देऊन भक्तीच्या चाकोरीत बंदिस्त केलं. दरदिवशी 25,000 लोक शिर्डीत जमतात पण किती लोकांना समाजशास्त्राr म्हणून साईबाबा माहीत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. या लेखाचा उद्देश साईबाबांचं महानत्व सांगण्याचा नाही तर निव्वळ माणूसपण सांगण्याचा आहे. किंबहुना गाडगेमहाराजांना जसं आपण ग्रामस्वच्छतेसाठी आदर्श मानतो, तोच स्तर साईबाबांचा असायला हवा होता. देवाचा नाही. या समाजशास्त्राrने लोकांना साधी राहणी शिकवली त्याला सोन्याच्या मुकुटाचे नवस बोलणे हा नक्की कोणाचा चहाटळपणा आहे हे ही सर्व साईभक्तांनी तपासायला पाहिजे. बाबांच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा नेमका काय परिणाम झाला? काहीच नाही. मग हे उगीचचे स्तोम कशासाठी? माणूस मोठा की त्याची कृती? ते विष्णूचा अवतार आहेत असा प्रचार करुन मुस्लिमांना उदासिन करण्यामागे भक्ती होती की धर्म-अर्थकारण? या सगळ्याचा उहापोह करायला नको का? वाढणाऱया गर्दीला जर तात्विक अधिष्ठान नसेल तर ही बौद्धिक गुलामगिरी वाढत जाणार आहे. तिला रोखायचं असेल तर पॅट्रीक गेडस्ना आदर्श करा. साईबाबांचं देवत्व विसर्जित करा. त्यांच्या माणूसपणाची प्रतिष्ठापना करा.

0 Comments
Post a Comment