`असत्यालाही सत्य म्हणून वारंवार सांगत राहिलात की तेच सत्य आहे असं सर्वजण एक दिवस मानू लागतात' या तंत्राचा उपयोग गोबेल्सने केल्यामुळे ते त्याच्याच नावाने ओळखलं जात असलं तरी जगभर याचा उपयोग युगानुयुगे होत आला आहे. बाबासाहेबांनीही आपलं एक तंत्र विकसित केलं पण ते त्यांच्या नावाने ओळखलं जात नाही याचं शल्य आहे.

 

If you tell a lie big enough and keep repeating it, people will eventually come to believe it. The lie can be maintained only for such time as the State can shield the people from the political, economic and/or military consequences of the lie. It thus becomes vitally important for the State to use all of its powers to repress dissent, for the truth is the mortal enemy of the lie, and thus by extension, the truth is the greatest enemy of the State.

`एखादी असत्य गोष्टी तुम्ही वारंवार सत्य म्हणून लोकांच्या मनावर बिंबवली तर कालांतराने लोक त्याच असत्य गोष्टीला सत्य मानू लागतात. सत्तेला जेव्हा जनतेच्या मनात राजकीय, आर्थिक किंवा संरक्षणाच्या संदर्भात आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करायची असते तेव्हा सत्य लपवण्यासाठी या तंत्राचा वापर होऊ शकतो. कारण सत्य हे असत्याचा शत्रू असते म्हणूनच ते असत्याच्या आधारावर उभ्या असलेल्या राज्याचा सुद्धा शत्रू असते.'

ज्या एका संकल्पनेवर सबंध विश्वातील राजकारण, अर्थकारण, शिक्षण, विविध संस्थांचे व्यवस्थापन आणि पसारमाध्यमे यांची कार्यपणाली अवलंबून आहे ते हे गोबेल्सचे तंत्र. गोबेल्सच्या नावावर बिनदिक्कत ते कुठेही वापरलं जातं. पण खुद्द गोबेल्सने हे तंत्र कुठे वापरलं होतं हे पाहिलं तर अंगावर काटा आल्यावाचून राहात नाही. डॉ. पॉल जोसेफ गोबेल्स हे जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलरच्या 13 मार्च, 1933 रोजी अस्तित्वात आलेल्या नाझी सोशालिस्ट सरकारमध्ये पसारमंत्री होते. 1933 ते 1945 या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशातील सर्व पसारमाध्यमे आपल्या मुठीत ठेवली. आणि आपल्या तंत्राचा यथेच्च उपयोग करुन हिटलरची नाझीसत्ता राबवण्यात मोलाची भर घातली. उत्कृष्ट वक्तृत्व लाभलेला गोबेल्स ज्यूंच्या विरोधात आवेशयुक्त भाषणे करण्यासाठी लोकपिय होता. `19 व्या शतकातील रोमँटिक नाटपे' याविषयात हेडलबर्ग युनिव्हर्सिटीमधून पीएचडी झालेल्या गोबेल्सने काही काळ पत्रकार, बँक क्लार्प आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये कॉलर म्हणून काम पाहिलं. काही नाटकं लिहिली पण ती पकाशन संस्थांनी नाकारली. 1933 साली तो हिटलरच्या नॅशनल सोशालिस्ट वर्पर्स पार्टीच्या संपर्कात आला. 1924 सालीच बर्लिनचा पादेशिक पार्टी नेता म्हणून त्याची नेमणूक झाली. इथे त्याने आपल्या पचार तंत्राचा सोशल डेमोकटिक पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी यांच्या विरोधात कौशल्याने वापर केला. भांडवलदार असलेल्या बहुसंख्य ज्यूंच्या विरोधात त्याने कामगारांचा पाठींबा मिळाला. आणि अल्पावधीतच म्हणजे 1928मध्ये पक्षाचा महत्त्वाचा आणि सुपसिद्ध पुढारी झाला.



1933 मध्ये हिटलरच्या नॅशनल सोशालिस्ट पार्टीचा पसारमंत्री झाल्यावर सर्वात आधी काय काम केलं असेल ? तर ज्यूंच्या अखत्यारीत असलेल्या प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेली आणि ज्यूंचा उदोउदो करणारी जवळपास 25,000 पुस्तकं जाळून टाकली. चांगल्या राज्यकर्त्याला लोकांच्या विचारांवर हुकूमत गाजवता आली पाहिजे, ह्या विचारांच्या गोबेल्सने ज्यूंच्या स्वसमर्थनाचा पहिला मार्गच बंद करून टाकला. 1945 पर्यंत दुसऱया महायुद्धानंतर आणि हिटलरच्या आत्महत्येनंतर त्याची राजवट संपुष्टात येईपर्यंत म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गोबेल्स अभिमानाने `हेल हिटलर' (हिटलरच विजय असो)असेच म्हणत राहीला.

असत्यालाही सत्य म्हणून वारंवार सांगत राहिलात की तेच सत्य आहे असं सर्वजण एक दिवस मानू लागतात या तंत्राचा उपयोग गोबेल्सने केल्यामुळे ते त्याच्याच नावाने ओळखलं जात असलं तरी जगभर याचा उपयोग युगानुयुगे होत आला आहे. इतिहासकारांच्या संशोधनानंतर आज हा देश नागवंशीयांचा कसा होता हे परोपरीने सांगितलं जात आहे. कारण इथे आलेल्या आर्यांनी ज्या पद्धतीने या तंत्राचा वापर करून इथल्या लोकांवर मोहिनी घातली ती इतक्या पुराव्यानिशी सादर झालेल्या इतिहास कथनानंतरही उतरत नाहीये. याला कारण आहे ते या तंत्राचा सातत्याने होणारा वापर.  एकदा सांगितलं आणि आपलं कर्तव्य संपलं असं याबाबतीत कधीच झालं नाही. अगदी अलिकडचं आणि साधं उदाहरण म्हणजे बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने कारसेवकांची मानसिकता तयार करण्यासाठी वापरलेलं वाक्य. ते वाक्य होतं, `गर्वसे कहो हम हिंदू है'. इंग्रजीत ज्याला आपण `हॅमरिंग' म्हणतो तो चपखल परिणाम या वाक्याने साधला होता. बाबरी मस्जिद पाडली गेली, त्यावर राजकारण, सत्तापालट झालं, हे वाक्य लिहीलेले मोठ माठे बॅनर्स उतरवून अडगळीत टाकले गेले पण ते वाक्य काही लोकांच्या डोक्यातून गेलं नाही. आपल्याला लक्षात येईल की या प्रचंड `हॅमरिंग'च्या नंतरच मोठ्या प्रमाणवर बाबा, बुवांचं प्रस्थ वाढलं. मीडिया प्रबळ झाला तो याच बातम्यांचं चर्वितचरण केल्यामुळे. आणि मग बातमी असो वा नसो, `हॅमरिंग' व्हायचं राहिलं नाही. गोबेल्सचं तंत्र नेहमीच जिंकत राहिलं.



या युगाला जाहिरातीचं युग म्हटलं गेलं ते ही याचमुळे. आपलीच आपण प्रसिद्धी केली पाहिजे म्हणून `पी.आर' ही नवी जात जन्माला घातली गेली. कला हि सामुदायिक सुखासाठी आवश्यक असते पण ती स्वान्त सुखाय वापरली गेली आणि सामुदायिक सुखासाठी पी.आर नेमले गेले. पैसा या दैवताला यथेच्च वापरलं गेलं आणि अमेरिकन भांडवलशाही इस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच इकडची सासुरवाशीण झाली. गोबेल्सचं तंत्र पुन्हा जिंकलं.

या तंत्राचा गाभा खरं तर `सातत्य' हा आहे. त्यामुळेच त्याला सकारात्मक बाजूही आहे जी मुलांच्या जडणघडणीत आपण वापरतो. समजाचंहि तसंच आहे तो कधीच कौमार्यात किंवा तारुण्यात पदार्पण करत नाही. प्रगल्भ तर होतच नाही. तो नेहमी बाल्यावस्थेतच असतो. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वानाला आपल्या कार्यातील हे सातत्य टिकवून ठेवावं लागलं. पण हे सातत्य वेगळं होतं. जबरदस्तीचं नव्हतं. उपाशीच असणाऱया समाजाला उपोषण करायला लावणारं नव्हतं. आधीच फाटक्या असलेल्या समाजाला पंचा नेसायला लावणारं नव्हतं. काळाराम मंदिर प्रवेश हे आंदोलन झालं पण ते कसं झालं याचा अभ्यास सर्व समाजशास्त्राRनी करायला हवा. साखळी पद्धतीने झालेलं हे आंदोलन 5 वर्ष चाललं. दरम्यान बाबासाहेब दोन गोलमेज परिषदांना उपस्थिती लावून आले. हेच ते सातत्य बाबासाहेबांनी अखेरच्या क्षणापर्यंत टिकवलं. आज आपण गोबेल्सचं नाव घेतो पण बाबासाहेबांच्या या तंत्राचं अनुकरण का करत नाही?

   एखादी गोष्ट सतत बोलल्याने जशी बिंबवली जाते तशीच अजिबात प्रतिक्रिया दिल्यानेही आपला बचाव साधता येतो. गोबेल्सच्या तंत्राची ही दुसरी बाजू आहे. सातत्य ठेवल्याने जसं सर्व लक्षात राहतं तसंच कृतीच खंडीत केली तर माणसाच्या विसराळूपणाचा फायदा उचलता येतो. मुख्यप्रवाहातील प्रसार माध्यमं नेमकं हेच करत आहेत.

या सर्व बाबींवरून गोबेल्सच्या तंत्राचा वापर सोईस्करपणे करता येऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. नाझीवादाचं पोषण केलेल्या या तंत्राने मानव्याला काळीमा फासणारी `कॉन्सनट्रेशन कँप' नावाची नवीन संज्ञा जन्माला घातली. पण त्याच हिटलरला आपला अंत आपल्याच हाताने करून घ्यावा लागला. गोबेल्सनेही आपल्या पत्नी आणि सहा मुलांसह आत्महत्या केली. हा त्या तंत्राचाच परिणाम होता. तरीही इतर त्याचा वापर करत आहेत. बौद्धधम्माचे अधिष्ठान लाभलेले आपण या तंत्राचा वापर बाबासाहेबांच्या पद्धतीने केंव्हा करणार हा प्रश्न आहे.